|
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांनी त्यांचे धर्मांतर करून नंतर मुसलमानांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे विधान ‘इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदे’चे (‘आय.एम्.सी.’चे) अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात २१ जुलैला ५ जोडप्यांचे सामूहिक विवाह होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देतांना ‘आय.एम्.सी.’चे प्रभारी नदीम कुरेशी यांनी सांगितले की, २१ जुलै या दिवशी सामूहिक विवाह कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नगर दंडाधिकार्यांकडे अनुमती मागितली आहे.
Will convert 23 Hindu boys and girls to I$lam and marry them to Mu$l!ms : Mass marriage ceremony planned for July 21st in Bareilly Uttar Pradesh – Provocative statement of Maulana Tauqeer Raza
In Hindu-majority India, it is shameful for the government and 1 billion Hindus that… pic.twitter.com/SH141d6Q2R
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 16, 2024
(म्हणे) ‘गंगा-जमुनी तहजीब’साठी अशा विवाहांना अनुमती हवी !
मौलाना तौकीर रझा त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, देशात ‘गंगा-जमुनी तहजीब’चा (गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणारे हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) आदर्श ठेवण्यासाठी अशा सामूहिक विवाह कार्यक्रमांना अनुमती दिली पाहिजे. (उद्या मुसलमान तरुणींचे धर्मांतर करून त्यांचे हिंदु तरुणांशी विवाह करण्याचा सामूहिक विवाह कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तर मौलाना तौकीर रझा आणि त्यांचे अन्य नेते मान्य करतील का ? – संपादक)
विवाह करणारे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात आहेत !
मौलाना तौकीर पुढे म्हणाले की, १५ हिंदु तरुण आणि ८ तरुणी संपर्कात आहेत. त्यांपैकी बहुतेकांनी आधीच धर्मांतर केले आहे. ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहात आहेत. लिव्ह-इन रिलेशनशिपला न्यायालयाने मान्यता दिली असली, तरी परिस्थिती आपल्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. कोणताही धर्म किंवा समाज ते स्वीकारत नाही. सामूहिक विवाहाद्वारे त्यांना त्यांचे जीवन सार्वजनिकरित्या जगायचे आहे.
आम्ही काहीही बेकायदेशीर करत नाही
तौकीर रझा पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात ५ जोडप्यांनी लग्नाची इच्छा व्यक्त केली असून हा कार्यक्रम खलील शाळेत होणार आहे. ‘हिंदूंच्या धर्मांतर आणि सामूहिक विवाहावरून वाद निर्माण होणार का ?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर मौलाना म्हणाले की, ते प्रौढ आहेत. यापूर्वी अनेक मुसलमान तरुण आणि तरुणी यांनी स्वेच्छेने धर्मांतर केले आहे, आम्ही कधीही विरोध केला नाही. आम्ही काहीही बेकायदेशीर करत नाही.
हा शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट ! – महंत पंडित सुशील पाठक
‘मौलाना तौकीर अशी चिथावणीखोर विधाने करून बरेलीची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत आहेत. योगी सरकारने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी शिर्डी साई सर्वदेव मंदिराचे महंत पंडित सुशील पाठक यांनी केली आहे.
नाथ नागरी सुरक्षा गटाच्या अधिकार्यांनीही या धर्मांतरावर आक्षेप घेतला आहे. संघटनेचे शाखाध्यक्ष दुर्गेश गुप्ता यांनी सांगितले की, याविरोधात ते जिल्हा न्यायदंडाधिकार्यांची भेट घेणार आहोत.
संपादकीय भूमिका
|