सांगली येथे स्थानिक बसच्या फेर्‍या वाढवा ! – भाजप महिला मोर्चाची मागणी 

विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना निवेदन देतांना भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या 

सांगली – स्थानिक वाहतुकीसाठी सांगली आगाराकडे २० आणि मिरज आगाराकडे केवळ २० गाड्या आहेत. यामुळे सांगलीपासून २० किलोमीटर परिसरातून ये-जा करणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ५० आसनक्षमता असलेल्या बसमधून १०० प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवासी एवढे असतात की, वाहकास गर्दीतून तिकीट काढण्यासाठी फिरणेही अशक्य होते. अधिक प्रवासी संख्येमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महापालिका क्षेत्रातील स्थानिक बसच्या फेर्‍या वाढवाव्यात, या मागणीचे निवेदन ‘भाजप महिला मोर्चा’च्या वतीने विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना देण्यात आले.

याप्रसंगी भाजप प्रदेश महामंत्री अधिवक्त्या स्वाती शिंदे, जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे-पाटील, उर्मिला बेलवलकर, ज्योती कांबळे, प्राची फाटक, स्मिता भाटकर, मनीषा सातपुते, अनघा कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होत्या.