ठाणे – मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर धर्मांधाकडून महिलेची छेडछाड केल्याची आणि धर्मांध जमावाने मंदिरात घुसून विटंबना केल्याची घटना ताजी असतांनाच शहबाज खान याने एका रिक्शाचालकावर चाकूने वार करून त्याला गंभीर घायाळ केल्याची घटना घडली.
घोडबंदर परिसरात १२ जुलै या दिवशी सायंकाळी रस्त्यावरील पाणी अंगावर उडल्याच्या कारणावरून शहबाज खान याने रिक्शाचालकावर थेट चाकूने वार करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. भररस्त्यात ही घटना घडल्याने रिक्शाचालकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी रिक्शाचालक संघटनेने आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|