हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीची हत्या केल्याचे प्रकरण
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – नेहाच्या हत्येमागे एकच व्यक्ती नसून अनेक व्यक्तींचा हात आहे. हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये एकाचेच नाव आल्याने संशय निर्माण झाला आहे. हत्येमागे इतरांचे षड्यंत्र आहे. ते लपवण्यात आले आहे. हत्या एकाच व्यक्तीने करणे शक्य नाही, असा आरोप नेहाचे वडील आणि काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी केला.
निरंजन हिरेमठ पुढे म्हणाले की, अनेक व्यक्ती यात सहभागी असून अदृश्य हाताने हे काम केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने हे उघड करणे आवश्यक होते. ‘विवाहाला नकार दिल्याने हत्या’ हा विचारही खोटा आहे. आरोपी जामीनावर बाहेर यावा, असा काहींचा उद्देश आहे. सरकारची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे मला माझ्या मुलीच्या हत्येच्या संदर्भात न्याय मिळालेला नाही. चौकशी करतांनाच दिशाभूल करण्यात आली आहे. न्यायालयावर माझा विश्वास आहे. आरोपपत्राची प्रत हाती येताच अधिक बोलीन.
संपादकीय भूमिकानिरंजन हिरेमठ काँग्रेसचे नगरसेवक आहेत. राज्यात काँग्रेसचेच सरकार असतांना अशा प्रकारचा प्रयत्न होत असेल, तर काँग्रेस मुसलमानांच्या लांगूलचालनासमोर स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकालाही किंमत देत नाही, हे लक्षात येते ! |