इतका कचरा वाढेपर्यंत नेपाळ सरकार झोपले होते का ?

गिर्यारोहकांनी टाकलेला कचरा पर्वतावरून खाली  आणतांना नेपाळचे शेर्पा

‘माऊंट एव्हरेस्ट पर्वताच्या गिर्यारोहकांच्या तळाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात गिर्यारोहकांचे तंबू दिसतात. काही गिर्यारोहकही येथे दिसतात; मात्र या ठिकाणी कचरा दिसत आहे. गिर्यारोहकांनी टाकलेला कचरा पर्वतावरून खाली आणण्याचे काम नेपाळचे शेर्पा करत आहेत. नेपाळ सरकारने ११ एप्रिल २०२४ पासून स्वच्छता मोहीम चालू केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पथकाकडून ११ टन कचरा उचलण्यात आला आहे, तसेच ४ मृतदेह आणि मनुष्याचा १ सांगाडाही काढण्यात आला आहे. या भागात अजूनही ४० ते ५० टन कचरा असू शकतो, असे शेर्पा यांनी सांगितले. हा कचरा उचलण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.’ (८.७.२०२४)