१३ जुलैला सहस्रो शिवभक्तांसह विशाळगडावर जाणार ! – छत्रपती संभाजीराजे

छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर – विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी  कोल्हापूर येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सहस्रो शिवभक्तांसह १३ जुलैला विशाळगडावर जाणार असल्याचे सांगितले. ‘१३ जुलैला ‘आम्ही काय करणार, ते सांगून करणार नाही’, अशी चेतावणी प्रशासनाला दिली आहे.