ग्‍वाल्‍हेर (मध्‍यप्रदेश) येथे बहिणीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांध मुसलमानांनी भोसकले !

ग्‍वाल्‍हेर (मध्‍यप्रदेश) – येथे बहिणीचा विनयभंग करण्‍याच्‍या कृत्‍याला विरोध करणार्‍या हिंदु तरुणावर मुसलमान तरुणांनी चाकूने वार केला. सौरभ यादव असे पीडित तरुणाचे नाव असून त्‍याच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. सलमान, मुबारिक, इम्रान आणि समीर खान अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सलमान आणि इम्रान यांना अटक केली आहे. मुबारिक आणि समीर खान पसार असून त्‍यांचा शोध चालू आहे.

१. बालकिशन यादव येथील हरिकोटाशीर परिसरात किराणा दुकान चालवतात. बालकिशन त्‍यांच्‍या मुलीसह दुकानात उपस्‍थित होते. त्‍या वेळी सलमान, इम्रान, मुबारिक आणि समीर खान तेथे पोचले. हे सर्व जण आपगंज या मुसलमानबहुल भागात रहातात. त्‍यांनी बालकिशन यांच्‍या मुलीचा विनयभंग केला. मुलीने याचा विरोध केला असता चौघांनी मिळून तिला मारहाण करण्‍यास चालू केले. बालकिशन यांनी त्‍यांना थांबवण्‍याचा प्रयत्न केल्‍यावर त्‍यांनाही मारहाण करण्‍यात आली. बालकिशन यांचा मुलगा सौरभही दुकानात पोचला. मारहाणीला विरोध केल्‍याने आरोपींनी सौरभ यादव याच्‍यावर चाकूने वार केले.

२. या घटनेविषयी ‘हिंदू जागरण मंच’चे पदाधिकारी वसंत गोड्याले म्‍हणाले की, ४ आरोपींपैकी समीर खान याने यापूर्वीच एका हिंदु मुलीची छेडछाड आणि अत्‍याचार केल्‍याच्‍या प्रकरणी कारावास भोगला आहे. (हिंदु मुलींची छेड करणे, लव्‍ह जिहाद करून त्‍यांना फसवणे, त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करणे आदी कृत्‍ये करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होत नसल्‍यामुळे ते पुनःपुन्‍हा अशी कृत्‍ये करण्‍यास धजावतात ! – संपादक)

३. सौरभ यादव यांच्‍यावर झालेल्‍या आक्रमणाच्‍या निषेधार्थ वसंत गोड्याले आणि त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी पोलीस ठाण्‍यात कारवाईची मागणी केली असता त्‍यांना धर्मांधांकडून ठार मारण्‍याची धमकी देण्‍यात आली.

संपादकीय भूमिका 

  • मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार अनेक वर्षे असतांना अजूनही धर्मांधांचे हिंदूंच्‍या संदर्भात असे कृत्‍य करण्‍याचे धाडस कसे होते ? असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात उपस्‍थित होतो !
  • धर्मांधांवर पोलीस आणि प्रशासन यांचा वाचक न राहिल्‍यामुळे ते उद्दाम झाले आहेत. ही स्‍थिती हिंदूंसाठी धोकादायक आहे !
  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्‍हणणारे आता कुठल्‍या बिळात लपले आहेत ?