कलबुर्गी (कर्नाटक) येथील घटना
कलबुर्गी (कर्नाटक) – येथे एका हिंदु तरुणाने त्याच्या मित्राच्या लग्नात श्रीराममंदिराच्या गीतावर नृत्य केले. याचा राग धरून ५-६ धर्मांध मुसलमान तरुणांनी त्याच्यावर आक्रमण करून त्याला अमानुष मारहाण केली. जिल्ह्यातील इटागा गावातील ही घटना असून १ जुलैला भीमाशंकर या हिंदु तरुणाने ‘अगर छुआ तो मंदिर को, तेरी औकात दिखा देंगे’, हे गीत वाजवून त्यावर नृत्य केले होते.
स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार २ जुलैच्या सकाळी ५-६ मुसलमान तरुणांनी नृत्य करणार्या भीमाशंकर यांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण केली. खानपाशा, खाजापाशा, मशाक पटेल, फिरोज, कासिम, मदार आणि नईम अशी आक्रमणकार्यांची नावे आहेत. या आक्रमणामुळे भीमाशंकर यांचे कुटुंब घाबरले असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आक्रमण केलेल्या काही तरुणांनाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे. भीमाशंकर यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोलार शहरातील अर्हल्ली गेटजवळ हिंदु आणि मुसलमान यांच्यात हाणामारी झाली होती. नादप्रभु केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंतीनिमित्त मशिदीसमोर डीजे वाजवल्यावरून वाद झाला होता.
संपादकीय भूमिका
|