जरांगे यांना संरक्षण द्या ! – वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

विजय वडेट्टीवार

मुंबई, २ जुलै (वार्ता.) – अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ‘ड्रोन’ फिरत आहेत. त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी कोण करते ? कशामुळे टेहाळणी केली जात आहे ? अंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या. ड्रोन कोण फिरवत आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २ जुलै या दिवशी विधानसभेत केली. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी याविषयी पोलिसांकडून अहवाल घेण्यात येईल, अशी माहिती दिली.