बल हेच एकमात्र औषध !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

स्वामी विवेकानंद

बल हीच एकमात्र आवश्यक गोष्ट होय. बल हेच भवरोगाचे एकमात्र औषध होय. श्रीमंतांकडून चिरडल्या जाणार्‍या गरीब लोकांसाठी बल हेच एकमात्र औषध आहे. विद्वानांकडून भरडल्या जाणार्‍या अज्ञ लोकांसाठी बल हेच एकमात्र औषध आहे आणि अन्य पापी व्यक्तींचा ज्यांच्यावर जुलूम होतो, अशा पापी लोकांसाठीही बल हेच एकमात्र औषध आहे.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)