हिंदु राष्ट्र आले की, श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल ! 

ईश्वराच्या कृपेने मी पूर्ण भारतात ३ सहस्र ६०० ठिकाणी फिरलो. जयपूर येथून श्रीकृष्णभूमी मुक्ती आंदोलन चालवले आहे. मी शंकराचार्यांनाही विनंती केली आहे की, तुमच्या पिठाच्या भविष्यकाळातील सुरक्षेसाठी दक्षिण सोडून आता उत्तरेत या. गंगातीरावरील पंडित, पुरोहित यांनाही मी सांगतो की, तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील, तर श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच मला जगद्गुरु शंकराचार्यांनीही सांगितले की, हिंदु राष्ट्र आले की, श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल. आज भारतात गोरक्षण, मंदिरमुक्ती, गडदुर्ग, गरिबी आदी अनेक समस्या आहेत; परंतु सर्वांवरील उत्तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, त्याप्रमाणे एकच आहे, ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ !

– आचार्य राजेश्वर, राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त भारतीय धर्मसंसद, राजस्थान.