‘गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) शतशः नमन !
या दिव्य महापुरुषाने हिंदु धर्मातील लुप्त झालेल्या वैदिक संस्कृतीचे पुनरुत्थान केले आणि सर्वांना हिंदुत्वाचे महत्त्व समजावले. त्यांनी हिंदु राष्ट्राची कल्पना साकार होण्याच्या दृष्टीने लोकांमध्ये जागृती केली. अशा युगपुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम !
माझे मोठे भाग्य आहे की, प्रत्येक वर्षी मला त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे. ‘त्यांचे ऋण मी या जन्मात फेडू शकीन कि नाही ?’, हे मला ठाऊक नाही.’
– श्री. रामनारायण मिश्रा, अध्यक्ष, ब्राह्मण महासभा, नागपूर. (२३.६.२०२४)