देहली येथील ‘विश्व पुस्तक मेळाव्या’त सेवा करतांना सौ. वैदेही पेठकर यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेल्या प्रार्थनेचे साधिकेला स्मरण होऊन साधिकेकडून तशीच प्रार्थना पुनःपुन्हा होणे

‘१०.२.२०२४ या दिवशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका विश्व पुस्तक मेळाव्यात दीप प्रज्वलित करत होते. त्या वेळी त्यांनी प्रार्थना केली, ‘सर्वांच्या अंतर्मनात गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) ज्ञानदीप प्रज्वलित होऊन गुरुदेवांच्या चैतन्याने सर्वांचे अंतर्मन प्रकाशित होवो.’ त्यांच्या या वाक्याचे मला पुनःपुन्हा स्मरण होऊन माझ्याकडूनही तशीच प्रार्थना होत होती.

सौ. वैदेही पेठकर

२. सद्गुरु पिंगळेकाकांना ‘गुरुदेवांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोचावे’, अशी तळमळ असणे

माझ्या मनात कधी कधी असे विचार यायचे, ‘सद्गुरु आणि संत ग्रंथप्रदर्शन कक्षावर कशाप्रकारे सेवा करत असतील ?’ ‘विश्व पुस्तक मेळाव्या’च्या सेवेच्या कालावधीत सद्गुरु पिंगळेकाका भेट देणार्‍या जिज्ञासूंना माहिती देणे, ग्रंथांविषयी सांगणे, ग्रंथ विषयानुसार लावणे, अशा विविध प्रकारच्या सेवा करत होते. सद्गुरु पिंगळेकाकांच्या मनात एकच विचार असतो, ‘माझ्या गुरूंचे कार्य असे झाले पाहिजे की, प्रत्येक जिवापर्यंत गुरुदेवांचे ज्ञान पोचले पाहिजे.’ सद्गुरु पिंगळेकाका गुरुदेवांचे एक आदर्श शिष्य आहेत.

३. सद्गुरु पिंगळेकाकांनी सूक्ष्मातून ग्रंथकक्षावर सेवा करणार्‍या साधकांसाठी नामजपादी उपाय करणे

दुसर्‍या दिवशी मला आध्यात्मिक त्रास होत होता. ‘माझ्या पायांमध्ये शक्ती नाही’, असे मला जाणवत होते. मी मला होत असलेला त्रास ग्रंथकक्षावरील एका साधकाला सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘सद्गुरु पिंगळेकाका आपल्या सर्वांसाठी नामजपादी उपाय करत आहेत.’’ त्या वेळी ‘सद्गुरुकाका कक्षाच्या थोड्या अंतरावर आसंदीत बसून आम्हा सर्वांसाठी नामजपादी उपाय करत आहेत’, असे मला दिसले. तेव्हा ‘सद्गुरुकाका सूक्ष्मातून आम्हा साधकांवर किती कृपा करत आहेत !’ याची मी कल्पनाही करू शकत नाही’, हे माझ्या लक्षात आले. स्थुलातून त्यांना आमच्यासाठी उपाय करतांना पाहून माझ्यामध्ये पुष्कळ कृतज्ञताभाव जागृत झाला.

गुरुदेव, आपण आम्हाला आपल्या चरणी आश्रय दिला, यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. माझा प्रत्येक श्वास गुरुदेव आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या चरणी अर्पण होऊ दे. सद्गुरु पिंगळेकाकांसारखी तळमळ आम्हा सर्व साधकांमध्ये निर्माण होऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वैदेही पेठकर (वय ४५ वर्षे), ग्वाल्हेर, मध्यप्रदेश. (१०.२.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक