थोडक्यात पण महत्वाचे : मालेगाव येथे पालिकेतील लाचखोर लिपिक अटकेत !…..अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणारे धर्मांध अटकेत…..

मालेगाव येथे पालिकेतील लाचखोर लिपिक अटकेत !

नाशिक – प्रलंबित देयक संमतीसाठी दलाली म्हणून ३३ सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या मालेगाव येथील आयुक्त कर विभागातील वरिष्ठ लिपीक सचिन महाले  याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : भ्रष्टाचार मुरलेल्या महापालिका असणे राज्याला लज्जास्पद !


अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणारे धर्मांध अटकेत

मुंबई – प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणारे  रफीक शेख (वय ३५ वर्षे) आणि महंमद दिलशान खान (वय ३० वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरांनी ४ लाख १५ सहस्र रुपये आणि ‘मैंने गांधी को क्यू मारा’ या चित्रपटाचे रिल चोरून नेले होते.

संपादकीय भूमिका : गुन्हेगारीत बहुसंख्य असणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षाच हवी !


दरोडा घालणारे ३ धर्मांध कह्यात !

मुंबई – गोरेगाव येथे दरोडा घालण्याच्या सिद्धतेत असलेले महंमद अली रफिक अन्सारी, सलमान महंमद रफिक अन्सारी आणि नफीस महंमद चौधरी यांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या विराेधात यापूर्वी चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. आरोपी परिसरातील मोठे दुकान लुटण्याच्या प्रयत्नात होते.


बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगणारा धर्मांध अटकेत

ठाणे, २२ जून (वार्ता.) – बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगणारा आरोपी सिद्धीक अहमद मतिउर रेहमान शेख (वय २४ वर्षे) येणार असल्याची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) आणि ४ जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.


बेकायदेशीरपणे बांधलेल्या १० श्वानांची सुटका !

ठाणे – येथे एका अस्वच्छ जागेत १० विदेशी आणि दोन देशी श्वान यांना बेकायदेशीरपणे बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना पुरेसे खाद्यपदार्थ दिले जात नव्हते. प्राणीप्रेमी संघटनांच्या मध्यस्थीनंतर या श्वानांची सुटका करण्यात आली. श्वानांना बांधून ठेवणारी व्यक्ती आस्थापनांना त्यांच्या सुरक्षेसाठी श्वान पुरवण्याचा व्यवसाय करते. तिच्याकडे श्वानांची कोणतीही नोंदणी आढळून आली नाही. (संबंधितावर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)