प्रत्येक समस्येवर अचूक आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना श्रद्धेने प्रार्थना केल्यावर काहीही होऊ शकते’, याची प्रचीती येणे

‘माझी मुलगी कु. ऐश्वर्या अमेरिकेतील नोकरी सोडून २ मासांसाठी भारतात आली होती. भारतातून परत अमेरिकेला निघतांना तिला काळजी वाटायला लागली. ती मला म्हणाली, ‘‘आई, नोकरी मिळणे पुष्कळ अशक्य आहे. मला आता काळजी वाटत आहे. नोकरी मिळेल का ?’’ ‘तिला कसा धीर देऊ ?’, या विचाराने मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली. तिला अमेरिकेला जातांना एका आस्थापनामधून मुलाखतीसाठी भ्रमणभाष आला. तिला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘गुरुदेवांना श्रद्धेने प्रार्थना केल्यावर काहीही होऊ शकते’, याची जाणीव होऊन माझा कंठ दाटून आला.

२. नोकरी न मिळाल्यामुळे मुलीला निराशा येणे

त्यानंतर तिने त्या आस्थापनात ३ मुलाखती दिल्या. सगळ्या मुलाखती चांगल्या झाल्या; पण त्या आस्थापनाने ‘आम्ही ही नोकरी दुसर्‍या उमेदवाराला दिली’, असे तिला सांगितले. त्यामुळे क्षणात ती पुष्कळ निराश झाली. तिने मला भ्रमणभाष केला आणि रडतच सांगितले, ‘‘इतकी चांगली मुलाखत झाली, तरी मला नोकरी मिळाली नाही. काय करू ?’’

सौ. पौर्णिमा प्रभु

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे आईने नामजपादी उपाय केल्याने मुलीच्या स्थितीत एका दिवसात पुष्कळ पालट होणे

मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना तिची स्थिती सांगून त्यातून बाहेर पडण्यासाठी नामजपादी उपाय विचारले. त्यांनी मला तिच्यासाठी ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगितला, तसेच न्यास आणि मुद्राही सांगितली. मी एकच दिवस नामजप केला आणि मुलीच्या स्थितीत पुष्कळ पालट झाला. तिने उत्साहाने मला भ्रमणभाष केला आणि म्हणाली, ‘‘त्या आस्थापनात मला नोकरी मिळाली नाही; म्हणून मी दु:ख करणार नाही. मी इतर आस्थापनांत नोकरीसाठी अर्ज करणार आहे.’’ या प्रसंगातून मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपाचे महत्त्व कळले. मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आपल्यासाठी गुरुदेवांनी किती करायचे ? आता मुलांचेही दायित्व आपले दयाळू आणि कनवाळू गुरुदेव घेत आहेत.

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी साधिकेच्या मुलीला नोकरी मिळाल्यामुळे तिच्या आयुष्याचा दृष्टीकोन पालटून तिने साधनेला आरंभ करणे

त्यानंतर ८ दिवसांतच त्याच आस्थापनातून ऐश्वर्याला भ्रमणभाष आला, ‘तुझी मुलाखत चांगली झाली होती. आता आमच्याकडे आणखी एक ‘लिगल पोस्ट’ रिकामी झाली आहे आणि आम्ही ती तुला देऊ इच्छितो.’ ऐश्वर्याने लगेच ‘हो’ म्हटले आणि नंतर तिच्या आयुष्याचा दृष्टीकोनच पालटला. तिने मला लघुसंदेश पाठवला, ‘आई, मला प्रार्थना, नामजप आणि आशीर्वाद यांचे महत्त्व कळले. माझ्यावर तू एवढा विश्वास ठेवून माझ्यासाठी प्रार्थना आणि नामजप केलास. यासाठी पुष्कळ कृतज्ञता ! माझा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोनच पालटला आहे.’ त्यानंतर तिनेही नामजप आणि प्रार्थना करणे चालू केले.

इतकी मोठी पूर्ण आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन पालटण्याची अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– आपली चरण सेविका,

श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६४ वर्षे), बेंगळुरू (१४.३.२०२४)