Professor Promotes Islam To HinduStudents : मुसलमान प्राध्यापकाने व्हॉट्सअ‍ॅप गटाच्या माध्यमातून हिंदु विद्यार्थ्यांना सांगितले मुसलमान धर्म स्वीकारण्याचे लाभ !

  • उज्जैन (मध्यप्रदेश) येथील विक्रम विद्यापिठातील घटना

  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनानंतर प्रा. शेख याला १५ दिवसांसाठी पदावरून हटवले !

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील ‘विक्रम विद्यापिठा’मध्ये फार्मसी विभागाचा प्राध्यापक अनिश शेख याने हिंदु विद्यार्ध्यांना व्हॉट्सअ‍ॅप गटात समाविष्ट करून त्यांना नमाजपठण आणि मुसलमान धर्म स्वीकारणे, यांचे लाभ सांगिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (‘अ.भा.वि.प.’च्या) कार्यकर्त्यांनी प्रा. शेख याला विद्यापिठातून काढण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून प्रा. शेख याला १५ दिवसांसाठी पदावरून हटवण्यात आले आहे.

‘फार्मसी विभागाचे प्राध्यापक अनिश शेख विद्यार्थ्यांयांशी भेदभाव करतो. तो रसायनशास्त्रात मुसलमान विद्यार्थ्यांना चांगले गुण देतो; मात्र हिंदु विद्यार्थ्यांना अल्प गुण देतो आणि अनुत्तीर्णही करतो’, असा आरोप कार्यकर्त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी फार्मसी विभागाच्या दाराला टाळे ठोकले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस आदर्श चौधरी म्हणाले की, विद्येच्या मंदिरात अशा पद्धतीने धर्म शिकवणे चुकीचे आहे.

चौकशीनंतर कारवाई करणार ! – कुलगुरु

विद्यापिठाचे कुलगुरु अखिलेश कुमार म्हणाले की, याप्रकरणी एक चौकशी पथक सिद्ध करण्यात येईल. या पथकाकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. यात जर विद्यार्थ्यांचे आरोप खरे असल्याचे दिसून आले, तर आरोपी प्राध्यापकावर कठोर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका 

धर्मांध मुसलमान कितीही शिकला आणि मोठ्या पदावर पोचला, तरी तो त्याच्या धर्माचे पालन करतो अन् ‘काफीर हिंदूंना’ त्रास देतो किंवा त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतो ! याउलट हिंदू आत्मघातकी धर्मनिरपेक्षतेचे पालन करत रहातात !