Swara Bhaskar On Love Jihad : (म्‍हणे) ‘आधुनिक भारतात ‘लव्‍ह जिहाद’ ही सर्वांत मोठी कल्‍पित धारणा !’ – स्‍वरा भास्‍कर, अभिनेत्री

मुंबई – आधुनिक भारतात लव्‍ह जिहाद सर्वांत मोठी कल्‍पित धारणा आहे.  दक्षिण आशियाई देशांमध्‍ये आंतरधर्मीय विवाह होतात. भारतात मात्र लोक अन्‍यांच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यात नाक खुपसतात. एक हिंदु मुलगी मुसलमान मुलाशी लग्‍न करते, त्‍याला ‘लव्‍ह जिहाद’ समजले जाते. ही गोष्‍ट मलाही लागू होते. (स्‍वरा भास्‍कर हिचा विवाह फहाद अहमद याच्‍याशी झाला आहे.)

आधुनिक भारतात ‘लव्‍ह जिहाद’ ही सर्वांत मोठी कल्‍पित धारणा आहे, असे फुकाचे वक्‍तव्‍य डाव्‍या विचारसरणीची अभिनेत्री स्‍वरा भास्‍कर हिने ‘कनेक्‍ट सिने’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये केले.


या वेळी स्‍वरा भास्‍कर म्‍हणाली, ‘‘काही शहरांमध्‍ये ‘व्‍हॅलेंटाईन डे’च्‍या दिवशी आंतरधर्मीय जोडप्‍यांना मारहाण केली जाते. खरे तर लग्‍न ही गोष्‍ट २ व्‍यक्‍तींमध्‍ये होते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्‍हा आणि तिचा मित्र झहीर यांना काही वर्षांनंतर मुले होतील, तेव्‍हा त्‍यांच्‍या मुलांच्‍या नावांवरून वेगळीच चर्चा चालू होईल. (अभिनेत्री सोनाक्षी सिन्‍हा तिचा मित्र झहीर इक्‍बाल याच्‍याशी आंतरधर्मीय विवाह करणार असल्‍याची वृत्ते विविध माध्‍यमांवरून प्रसारित झाली आहेत.) अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांना मुले झाल्‍यावर असेच झाले होते. दोन सुजाण व्‍यक्‍ती वैयक्‍तिक आयुष्‍यात काय करतात ? त्‍याचा अन्‍यांशी कोणताही संबंध नाही. हा स्‍त्री-पुरुष आणि त्‍यांचे कुटुंब यांच्‍यातला वैयक्‍तिक विषय आहे. याप्रमाणे हे पूर्णत: सोनाक्षी हिचे आयुष्‍य आहे. तिने स्‍वत:चा जोडीदार स्‍वत: निवडला आहे. त्‍यांच्‍या लग्‍नाला कुटुंबियांची अनुमती आहे कि नाही, हा त्‍यांचा विषय आहे.’’

संपादकीय भूमिका

भारतातील सहस्रावधी हिंदु युवतींचे आयुष्‍य ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून धर्मांध मुसलमानांनी उद़्‍ध्‍वस्‍त केले आहे. लव्‍ह जिहादला बळी पडलेल्‍या एकातरी हिंदु युवतीची स्‍वरा भास्‍कर हिने भेट घेतली असती, तरी तिला खरा प्रकार समजला असता; परंतु याकडे सोयीस्‍कर दुर्लक्ष करून हिंदूंना संभ्रमित करण्‍याचे कामच स्‍वरा भास्‍कर करत आहे !