Kuwait Massive Fire : कुवेतमधील आगीच्या प्रकरणी ३ भारतियांसह ८ जणांना अटक   

मंगफ (कुवेत) – येथे १२ जूनच्या पहाटे ६ मजली इमारतीला लागलेल्या आगीत ५० जणांचा मृत्यू झाला होता. यांत ४५ भारतीय होते. या प्रकरणी पोलिसांनी भारताचे ३, इजिप्तचे ४ आणि कुवेतच्या एका नागरिकाला अटक केली आहे.

या इमारतीत १९६ कामगार रहात होते, त्यांपैकी बहुतेक भारतीय होते. कुवेत सरकार मृतांच्या नातेवाइकांना १२ लाख ५० सहस्र रुपये हानीभरपाई देणार आहे.