बुवाबाजी करणार्‍या नाना पटोले यांनी त्यागपत्र द्यावे !

भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांची मागणी

प्रकाश ढंग

सांगली, १९ जून (वार्ता.) – ‘पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतली आहे. बुवाबाजी करून राजकारणाला बट्टा लावणारे नाना पटोले यांनी त्वरित पदाचे त्यागपत्र देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा’, अशी मागणी येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. ‘त्यागपत्र न दिल्यास त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करू’, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.