नागरिकांनी आक्षेप घेतल्यावर कारवाई करणारे पोलीस आधीच स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

‘मौलवी अब्दुल रहीम राठोड याने बकरी ईदच्या निमित्ताने ज्या जनावरांची कुर्बानी दिली जाते, त्यांची सूची सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. त्या सूचीत त्याने गायीचाही समावेश केला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. अब्दुल याने ही सूची प्रसारित केल्यानंतर त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आणि त्याच्यावर कारवाई केली.’ (१८.६.२०२४)