मुंबई – मुंबईतील ५० रुग्णालये, काही महाविद्यालये आणि मुंबई महानगरपालिकाचे कार्यालय बाँबने उडवण्याी धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. जसलोक, रहेजा, सेव्हन हिल, कोहिनूर, के.ई.एम्., जेजे, सेंट जॉर्ज यांसह अन्यही प्रसिद्ध रुग्णालयांना, तसेच महाविद्यालये येथे असे धमकीचे मेल आले आहेत.
Threat to blow up 50 Hospitals, BMC Headquarters, and Colleges in Mumbai with bombs !
In the past few months, the police have received threats to blow up hospitals or schools with bombs in various parts of India.
Are some anti-social elements giving such threats due to a… pic.twitter.com/VHiNwczDJL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2024
१. पोलिसांनी रुग्णालये, महाविद्यालये आणि मुंबई महानगरपालिकेचे कार्यालय येथे बाँबपथकाद्वारे शोध घेतला; मात्र कुठेही बाँब किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. रुग्णालयांच्या खाटांखाली आणि प्रसाधनगृहांमध्येे बाँब ठेवण्यात आल्याचे मेलमध्ये लिहिले होते.
२. ईमेल करण्यासाठी ‘बीबल डॉट कॉम’ नावाच्या संकेतस्थळाचा उपयोग करण्यात आला आहे. धमकीचे ईमेल पाठवणार्याचा पोलीस शोध घेत आहेत. धमकीचे मेल आल्यावर काही महाविद्यालयांकडून पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली.
३. वल्लभभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. धमकीचा मेल करणार्या अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका
|