पुणे महापालिकेकडून शाळांना देणार्‍या ‘अग्नीशमन प्रमाणपत्रा’च्या शुल्कामध्ये वाढ !

प्रतिचौरस मीटर १० रुपयांप्रमाणे शुल्क !

पुणे – महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने ‘अग्नीशमन प्रमाणपत्रा’च्या नूतनीकरणासाठी शाळांना १५ सहस्र रुपयांऐवजी १ लाख रुपये देण्याचा आदेश काढला आहे. त्याचा भार स्वयंअर्थसाहाय्यित (विनाअनुदानित) शाळांना सोसावा लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शुल्क आकारावे, अशी मागणी ‘इंडिपेडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन’ आणि ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा’ने आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. ‘इंडिपेडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन’च्या शाळा विनाअनुदानित आहेत. त्यांना प्रतिवर्षी नूतनीकरण करावे लागते. अग्नीशमन विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासाठी १५ सहस्र रुपये शुल्क भरावे लागत होते. आता १० रुपये प्रतिचौरस मीटर शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे १० सहस्र चौरस मीटर शाळेला १ लाख रुपये भरावे लागतील.