Sanctions On Asim Munir : पाकिस्तानच्या सैन्यदलप्रमुखांवर निर्बंध लादण्याची अमेरिकेच्या संसद सदस्याची मागणी  !

पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर

वॉशिंग्टन – पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी निर्बंध लादण्यात यावेत, अशी मागणी भारतीय वंशाचे अमेरिकी संसद सदस्य रो खन्ना यांनी अमेरिकी सरकारकडे केली आहे. पाकिस्तानला भविष्यात शस्त्रास्त्रे मिळवण्यात अडचणी येण्याच्या दृष्टीने अमेरिकी धोरणांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

रो खन्ना म्हणाले,

१. पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये गोंधळ उडाला होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अजूनही कारागृहात आहेत.

३. असीम मुनीर हे पाकिस्तानी सैन्यदलप्रमुख नसून ते ‘सैन्यदल शासक’ आहेत. मुनीर आता अमेरिकेतील लोकशाही समर्थक पाकिस्तानी कुटुंबांना लक्ष्य करत आहेत.

४. जनरल मुनीर यांच्या राजवटीत इम्रान खान यांच्या समर्थकांना लक्ष्य केले जात आहे.

भ्रष्टाचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यांसाठी पाकिस्तानी सैन्यदल उत्तरदायी ! –  ग्रेग कसार

अमेरिकेचे आणखी एक संसद सदस्य ग्रेग कसार यांनी अमेरिकेच्या धोरणांमध्ये पालट करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अशा प्रकारे धोरणांमध्ये पालट केल्यास पाकिस्तानमधील मोठ्या प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यांसाठी पाकिस्तानी सैन्यदलाला उत्तरदायी धरता येईल. पालटलेल्या धोरणांमुळे अमेरिका पाकिस्तानला करत असलेले साहाय्यही बंद होईल. पाकिस्तानमध्ये सैन्यदलप्रमुखांच्या हस्तक्षेपामुळे शाहबाज शरीफ यांचे सरकार स्थापन झाले. इम्रान खान यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवण्याची त्यांची योजना आहे.