बकरी ईदला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर ‘राम’ लिहिणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

  • बेलापूर (नवी मुंबई) येथील घटना !

  • विहिंपच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनंतर कारवाई

‘राम’ असे लिहिलेले बोकड

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

नवी मुंबई, १६ जून (वार्ता.) – बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी (इस्लामी पद्धतीने दिला जाणारा पशूंचा बळी) देण्यासाठी आणलेल्या बोकडाच्या पोटावर ‘राम’ लिहून त्याची विक्री करणार्‍या ३ धर्मांधांना सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. महंमद शफी शेख, साजीद शेख, कय्युम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

१. ‘येथे एका दुकानात बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या एका बोकडाच्या पोटावर ‘राम’ असे लिहिले असून त्याला क्रूरतेने वागणूक देण्यात येत आहे, तसेच त्याला हत्येच्या उद्देशाने बांधून ठेवले आहे’, अशी माहिती स्वरूप पाटील यांना काही धर्माभिमान्यांनी दिली.

२. त्यानुसार पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलिसांसह संबंधित दुकानात जाऊन बोकड, रंगाचा डबा आणि ब्रश कह्यात घेतला.

३. दुकानातील २२ बकर्‍या कह्यात घेऊन त्यांना वाशीतील कोंडवड्यात ठेवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी याच दुकानदारावर गोमांस विक्री केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

४. संबंधित कारवाईच्या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे नवी मुंबई जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील, अमरजीत सुर्वे, नगर कार्यवाह निशांत नाईक, समाजसेवक नीलेश पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, बजरंग दल सहसंयोजक शंकर संगपाळ, तेजस पाटील, बेलापूर प्रखंड अध्यक्ष मुकेश गांधी, बेलापुर प्रखंड सहमंत्री सत्यप्रकाश सिंह, बेलापूर प्रखंड संयोजक जीवन देशमुख, बेलापूर प्रखंड सह संयोजक हर्षल सोनगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्यावर कारवाईसाठी तात्काळ संघटित होणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !