‘६४ कलांपैकी वर्ष १९९८ पासून ‘चित्रकला’, वर्ष २००१ पासून ‘संगीतकला’, वर्ष २००२ – २००३ पासून ‘मूर्तीकला’ आणि वर्ष २००३ पासून ‘नृत्यकला’ या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा मुख्य उद्देश ठेवून कलाकार-साधक साधना करत आहेत. या कलांसह तक्षण (सुतारकाम), वास्तूविद्या (घर बांधणे) यांसारख्या कलांच्या माध्यमातूनही साधक साधना करत आहेत. देवतांचे तत्त्व आकृष्ट करणारी देवतांची चित्रे, तसेच रांगोळ्या आणि मेंदी यांच्या कलाकृतीही सिद्ध करण्यात आल्या आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत विभागाचे आतापर्यंतचे कार्य !
१. वर्ष २०१७ पासून पुढील संशोधनात्मक प्रयोग केले.
१ अ. ‘भारतीय आणि पाश्चात्त्य गायन, वादन, नृत्य अन् नाट्य या कलांचा कलाकार, प्रेक्षक, झाडे अन् वस्तू यांच्यावर काय परिणाम होतो ?’, याचा विविध उपकरणांच्या साहाय्याने अभ्यास केला. याविषयीचे ८१९ उपक्रम राबवले
१ आ. गायन : ‘त्या त्या रागाशी संबंधित वेळेत तो तो राग ऐकणे आणि अन्य वेळी तोच राग ऐकणे’, याचा श्रोते अन् कलाकार यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासले. याविषयीचे ५३० उपक्रम राबवले.
१ इ. वादन : विविध वाद्यांच्या संथ, मध्य आणि द्रुत या लयींचा श्रोते अन् कलाकार यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासले. याविषयीचे १६४ उपक्रम राबवले.
१ ई. नृत्य : भारतीय नृत्य शास्त्रीय पद्धतीने करणे आणि ‘फ्युजन’वर (टीप २) शास्त्रीय नृत्य करणे’, यातील भेद अभ्यासले. याविषयीचे १२१ उपक्रम राबवले.
१ उ. सात्त्विक अभिनय, उदा. संत किंवा देवता यांच्या भूमिका आणि असात्त्विक अभिनय (क्रूर किंवा हिंसक व्यक्तीच्या भूमिका करणे) याचा दर्शक अन् कलाकार यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासले.
२. वर्ष २०१८ पासून समाजातील २०० हून अधिक गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रातील कलाकारांच्या भेटी घेऊन त्यांचा कलेकडे पहाण्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन, अनुभूती जाणून घेऊन त्याचा अभ्यास केला.
३. वर्ष २०१९ पासून साधना म्हणून संगीतकला जोपासणार्या ३८ हून अधिक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या.
४. वर्ष २०१८ पासून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या गोवा येथील संशोधन केंद्राला ७६ कलाकारांनी भेटी दिल्या.
५. वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये समष्टीसाठी सात्त्विक नामजपांची निर्मिती केली.
६. वर्ष २०२० पासून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘गायन, वादन आणि नृत्य’ या विषयांवरील संशोधनाचा केलेला अभ्यास आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’मध्ये (परिषदांमध्ये) मांडला असून विविध ‘वेबिनार’ (ऑनलाईन परिषद) अन् चर्चासत्रे यांच्या माध्यमातूनही ‘संगीत संशोधन’ हा विषय मांडला आहे.
७. वर्ष २०२३ पासून ‘कलेतून ईश्वप्राप्ती’ या विषयावरील शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
८. वर्ष २०२४ पासून कलाक्षेत्रातील शिबिरार्थींसाठी साधना म्हणून सत्संग प्रत्येक आठवड्याला नियमित सत्संग चालू झाला आहे. या सत्संगात ‘कलेला साधना कशी जोडायची ?’, याविषयी नियमित मार्गदर्शन केले जाते.
देश-विदेशांतील विविध कला, विद्या आणि उपाय जाणणार्या तज्ञांना शोधून त्यांना समाजासमोर आणणे, हेच ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे खरे संशोधन !
‘कोणतीही कला, विद्या किंवा विविध उपायांच्या पद्धती असोत, व्यक्तीच्या मर्यादित आयुष्याचा विचार करता तिला केवळ एकाच गोष्टीत संशोधन करणे, हे तिच्या आयुष्यात शक्य होते किंवा काही वेळा ती ते संशोधनही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अल्प कालावधीत १४ विद्या आणि ६४ कला यांचा अभ्यास करणे काळानुरूप कठीण आहे.
असे असले, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या अवतारी कार्यामुळेच आज समाजातील कितीतरी कला, विद्या आणि उपाय जाणणारे संत, तसेच हितचिंतक ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्याशी जोडले जात आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनात्मक अभ्यासाला समाजासमोर आणणे, हे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांत केलेले संशोधन आपोआपच समष्टीसाठी उपलब्ध होत आहे आणि यापुढेही होणार आहे.
यामुळेच असे वाटते की, वेगळ्या संशोधनासह देश-विदेशांतील विविध कला, विद्या आणि उपाय जाणणार्या तज्ञांना शोधून त्यांना समाजासमोर आणणे, हे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे खरे संशोधनच आहे !’
संगीत विभागाचे प्रस्तावित कार्य !
अ. संगीतातून साधना आणि संशोधन या विषयांवर विविध ग्रंथ प्रकाशित करणे
आ. संगीताविषयी केलेल्या संशोधनाचे कार्य ‘संकेतस्थळा’च्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवणे
इ. ‘संगीतातून साधना’ विषयावरील विविध चर्चासत्रे आयोजित करणे
ई. ‘संगीतातून साधना’ याविषयी घेतल्या जाणार्या शिबिरांची संख्या वाढवणे आणि त्यासाठी विविध जिल्ह्यांतही हा उपक्रम घेणे
उ. शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये ‘संगीत-नृत्य-नाट्य यांवरील संशोधन अन् साधना’ या विषयांचे अभ्यासक्रम चालू करण्यासाठी प्रयत्न करणे
ऊ. संगीताविषयी अधिवेशन घेणे.
– सुश्री तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.