महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाविषयी मान्यवर काय म्हणतात ?

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा विज्ञानाच्या भाषेत अध्यात्मशास्त्र समजावण्याचा प्रयत्न स्तुत्य ! – शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती, कांची कामकोठी पीठ

शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती, कांची कामकोठी पीठ

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने होत असलेले संशोधन कार्य प्रशंसनीय आहे. कलियुगामध्ये मानवाला विज्ञानाची भाषा कळते. हे विश्वविद्यालय विज्ञानाच्या भाषेत अध्यात्मशास्त्र समजावण्याचे स्तुत्य प्रयत्न करत आहे !


  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संगीतविषयक कार्य खरोखरच बारकाव्यांनिशी आणि वेगळ्या मार्गाने चांगल्या प्रकारे चालू आहे. – पू. पंडित गिंडे
  • ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दूरदृष्टीने चालू झालेले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य मानवजातीला उपयुक्त आहे !’ – श्री. राहुल गोस्वामी, ‘युनेस्को’चे सांस्कृतिक तज्ञ, बेंगळुरू, कर्नाटक.

पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याला आशीर्वाद !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज यांची ३ डिसेंबर २०२३ या दिवशी भेट घेतली. या वेळी ‘माझे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याला आशीर्वाद आहेत’, असे त्यांनी सांगितले.

विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेतल्यावर काहीतरी वेगळे मिळाल्याचा आनंद झाला ! – गौरीश तळवलकर, गायक

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येतांना वेगळा विचार करून आलो होतो; पण तुमचे कार्य जाणून घेतल्यावर मी आता वेगळेच काही घेऊन जात आहे आणि त्यात मला आनंद वाटत आहे.  या कार्यासाठी  आम्ही आमच्या परीने सर्व प्रकारचे सहकार्य करू. आश्रमात गायन करतांना एक वेगळीच ऊर्जा जाणवली. (२७.७.२०१८)

‘राजस्थान संगीत संस्थान’कडून विश्वविद्यालयाच्या कार्याची प्रशंसा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २० डिसेंबर २०१७ या दिवशी जयपूर येथील शिक्षा संकुल येथे असलेल्या ‘राजस्थान संगीत संस्थान’ला भेट दिली. या वेळी ‘राजस्थान संगीत संस्थाना’तील कथ्थक नृत्याच्या शिक्षिका कु. ज्योती भारती गोस्वामी यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, ‘‘आजच्या काळात असे कार्य करणारी संस्था आणि साधक यांच्या प्रती मी आभार व्यक्त करते. संस्थानकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्यात कोणत्याही प्रकारे साहाय्य लागल्यास आम्ही ते करू.’’ तसेच गोस्वामी यांनी महान भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि तिची जोपासना करण्यासासाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेचेही आभार मानले.

प्रा. रामनाथ झा यांच्याकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाची प्रशंसा !

या वेळी प्रा. रामनाथ झा यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाची प्रशंसा केली. त्यांनी ‘पुढील वेळी विश्वविद्यालयाला शोधनिबंध सादर करण्यासाठी अधिक वेळ देऊ’, असे आश्वासनही दिले.

 एका परिसंवादाचे आयोजक डॉ. दीक्षित आणि डॉ. सुजीत पांडे म्हणाले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शोधकार्य अतिशय चांगले आहे. तुमच्या संशोधन कार्यामुळे हा कार्यक्रम दर्जेदार होऊन आमची लाज राखली गेली.’’

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने जयपूर येथे सादर केलेल्या शोधप्रबंधाचे डॉ. भारतेंदु पांडेय यांनी केलेले कौतुक !

डॉ. भारतेंदु पांडेय हे त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधप्रबंधाचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘संस्कृतं नाम दैवी कवाक् अन्वाख्याता महर्षिभिः ।’ म्हणजे ‘संस्कृत ही देववाणी आहे, असे प्रत्यक्ष महर्षींनी सांगितले आहे’, या श्लोकाची सत्यता सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी सादर केलेल्या शोधप्रबंधानंतर लक्षात आली. हा श्लोक म्हणजे एखाद्या आचार्यांची प्रतिज्ञा किंवा एखादे ऋषि संस्कृतचे गुणगान करत आहेत, असे नाही, तर ते एक आशीर्वचन आहे. ज्याची प्रचीती एका विषयाच्या सादरीकरणानंतर आली.’’ डॉ. भारतेंदु पांडेय हे डोळ्यांनी पाहू शकत नाहीत; परंतु ते संस्कृतमध्ये विद्वान आहेत.

या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून अद्भुत कार्य होत आहे ! – अशोक प्रधान, संचालक, भारतीय विद्या भवन, देहली

देहली येथील ‘भारतीय विद्या भवन’चे संचालक (निर्देशक) श्री. अशोक प्रधान आणि या ‘विद्या भवन’च्या इंडोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शशिबाला यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधक तथा ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (एस्.एस्.आर्.एफ्.चे) संपादक श्री. शॉन क्लार्क यांच्यासह विश्वविद्यालयाच्या सौ. श्वेता क्लार्क आणि कु. कृतिका खत्री यांनी २९ जून २०१८ या दिवशी भेट घेतली. या भेटीत श्री. प्रधान यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून केल्या जाणार्‍या अध्यात्मविषयक संशोधनाच्या कार्याची माहिती दिली, तसेच साधना करण्याचे महत्त्व आणि ‘साधना केल्यामुळे जीवनात कसे परिवर्तन होते’, याविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी श्री. प्रधान यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाच्या माध्यमातून लोकांना आपल्या संस्कृतीविषयी अवगत करण्याचे अद्भुत कार्य होत आहे’, असे सांगितले.

श्री. प्रधान यांनी व्यक्तीमत्त्व विकासाविषयी कार्यक्रम ठेवण्याची इच्छाही श्री. शॉन क्लार्क यांच्याजवळ व्यक्त केली. डॉ. शशिबाला म्हणाल्या, ‘‘भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी आम्ही तुम्हाला सर्व ते साहाय्य करू. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला शोधनिबंध सादर करण्यासाठी आमंत्रित करू.’’

शोधनिबंध सादर केल्यानंतर नाडीज्योतिष परिषदेत उपस्थित मान्यवर आणि तज्ञ यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद !

१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय नाडीशास्त्राचा सखोल अन् व्यापक स्तरावरील प्रसार करते ! – विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक

‘मुंबई येथील नाडीज्योतिष परिषदेचे मुख्य संयोजक विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘नाडीशास्त्राचा सखोल आणि व्यापक स्तरावरील प्रसार अन् कार्य केवळ महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत आहे.’’

२. सर्वांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांकडून शिकावे ! – ग्रुप कॅप्टन राकेश नंदा 

मुंबई येथील नाडीज्योतिष परिषदेच्या आयोजकांपैकी ग्रुप कॅप्टन राकेश नंदा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून प्रभावित झाले. साधकांची नम्रता, तळमळ, वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा आदी गुणांनी प्रभावित होऊन ते म्हणाले, ‘‘साधक हे खर्‍या अर्थाने सैनिक आहेत आणि त्यांच्याकडून सर्वांनाच शिकायला मिळेल.’’

३. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शोधकार्य अतिशय चांगले ! – प्राध्यापिका डॉ. (सौ.) शशि तिवारी

देहलीतील परिसंवादात ‘राष्ट्रपतीपदक’ विजेत्या प्राध्यापिका डॉ. (सौ.) शशि तिवारी यांनी सांगितले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शोधकार्य अतिशय चांगले आहे. केवळ मानवप्राणी हाच एक असा जीव आहे की, त्याला मानवी मूल्ये शिकवावी लागतात; कारण मानवामध्ये मानवता आणावी लागते आणि त्यासाठी दैवी गुणांचे संवर्धन अन् वाईट प्रवृत्तींचे निर्दालन करणे आवश्यक आहे. ते हे विद्यालय करत आहे.’’

४. गुजरात येथील दैनिकांत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेल्या कार्यासंबंधी लिखाण नियमितपणे प्रसिद्ध करणारे मनोज शिंदे !

मुंबई येथील नाडीज्योतिष परिषदेला आलेले नाडीप्रेमी श्री. मनोज शिंदे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाने प्रभावित झाले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट देऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कार्याविषयी आणि आश्रमातील इतर उपक्रमांविषयी जाणून घेतले. ते गुजरात येथून प्रसिद्ध होणारे ‘सामना’ हे गुजराती दैनिक आणि ‘सामना टाईम्स’ हे हिंदी दैनिक यांचे मालक अन् संपादक आहेत. त्यांच्या दैनिकांत त्यांनी आध्यात्मिक संशोधनाशी संबंधित लिखाण नियमित प्रसिद्ध करण्यास आरंभ केला आहे.

५. विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधातून आध्यात्मिक उपचाराचा नवीन पैलू समजला ! – अनुप हिवळे

डेहराडून येथील चर्चचे व्यवस्थापक अनुप हिवळे यांनी विश्वविद्यालयाकडून नगर येथील परिषदेत सादर केलेला शोधनिबंध ऐकून ते म्हणाले, ‘‘येथे सादर केलेल्या शोधनिबंधातून समाजाची उन्नती व्हावी, ही तळमळ जाणवली. समाजाला साहाय्य करणे आणि आध्यात्मिक उपचार करणे, हा नवीन पैलू मला यात शिकायला मिळाला.’’

सौ. श्वेता क्लार्क

बँकॉक, थायलंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सात्त्विक चित्रकला’ या विषयावरील शोधनिबंधांवर उपस्थितांचे उत्स्फूर्त अभिप्राय

१. सर्वाेत्तम सादरीकरण !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेली अद्वितीय माहिती आणि संशोधन पाहून या शोधनिबंधांची उपस्थितांनी प्रशंसा तर केलीच आणि ‘हे सादरीकरण सर्वाेत्तम, तसेच जिज्ञासा निर्माण करणारे आहे’, असा अभिप्रायही दिला. त्याचप्रमाणे आतापर्यंत अशी अभ्यासपूर्ण माहिती प्रथमच मिळाल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

२. शोधनिबंध अधिक आवडला !

अभिप्राय पत्रकांत पुष्कळ लोकांनी पुढील अभिप्राय दिला, ‘या परिषदेमध्ये सादर करण्यात आलेल्या सर्व शोधनिबंधांमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सादर केलेला शोधनिबंध अधिक आवडला !’

३.  दृष्टीकोनात पालट होऊन सात्त्विक कला शिकवण्याविषयी माहिती विचारणे

‘मास मेडिया कम्युनिकेशन्स् फिलिपाइन्स’चे प्राध्यापक सौ. क्रिस्टेन जॉय सोम्बिल्लो आणि श्री. ॲलन डेव्हिड यांनी सांगितले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने सांगितलेले दृष्टीकोन ऐकून आमच्या कलेविषयीच्या दृष्टीकोनांत पालट झाला आहे. विद्यार्थ्यांना सात्त्विक कला कशी शिकवता येईल ?, ते तुम्ही आम्हाला सांगा.’’

ट्रनाव्हा विद्यापिठातील २ प्राध्यापक, ‘टुमॉरो पिपल’ या संघटनेच्या सदस्या आणि या परिषदेच्या आयोजक महिला श्रीमती निका, तसेच इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रा राज्यातील ‘शिक्षण आणि संस्कृती’ विभागाचे प्राध्यापक श्री. सलमान हसीबुआन यांनी संशोधन कार्याविषयी पुष्कळ जिज्ञासा दाखवून विश्वविद्यालयाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

– सौ. श्वेता क्लार्क (२५.११.२०१७)

संशोधनात्मक लेखांतून साधनेचे महत्त्व लक्षात येणे 

काही वाचकांनी सांगितले की, आपल्या संशोधनात्मक लेखांचा विषय कोणताही असो; पण तो साधना करण्यास उद्युक्त करतो. आम्हाला जमेल, तशी साधना करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यातून आम्हाला आनंद मिळतो. काही जिज्ञासू त्यांना साधनेविषयी काही शंका असल्यास त्यांचे निरसन करून घेतात.

आध्यात्मिक संशोधनाचा जगभर प्रसार व्हावा, अशी तळमळ असलेले वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणारे आध्यात्मिक संशोधन पाहून अनेक वाचक आणि जिज्ञासू प्रभावित होतात अन् सांगतात की, आपले संशोधन अप्रतिम आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते जगभर पोचायला हवे. तुम्ही आम्हाला या संशोधनात्मक लेखांच्या ‘लिंक’ (संकेतस्थळाची मार्गिका) पाठवा. आम्ही आमचे नातेवाईक, परििचत, मित्र-परिवार यांना हे लेख वाचण्यासाठी पाठवू.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

परिषदेचे अध्यक्ष डॉ. शॉन मोरन यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सादरीकरणाविषयी व्यक्त केलेले मनोगत !

‘१७.३.२०१८ या दिवशी लिस्बन (पोर्तुगाल) येथे ‘अध्यात्म आणि संस्कृती’ या विषयावरील पहिली जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. शॉन मोरन यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सादरीकरण चांगले झाल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर त्यांनी संगणकीय पत्र पाठवून स्वतःचे मनोगत व्यक्त केले.

– सद्गुरु सिरियाक वाले, युरोप