सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे !

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतरचा आज १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काढलेले उद्गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. संत आणि सामान्य व्यक्ती यांतील भेद !

‘‘सामान्य व्यक्तीचे पार्थिव इतका वेळ ठेवले, तर त्याची स्थिती कशी होईल ? यातून संत आणि सामान्य व्यक्ती यांच्यातील अंतर (भेद) लक्षात येते.

२. पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या पार्थिवातील चैतन्यामुळे त्यांचे  डोळे, ओठ, गाल, छाती, हात आणि पाय यांची बोटे यांची हालचाल चालू असल्यासारखे जाणवणे

‘पू. मेनराय यांचा नामजप अजूनही होत असल्याप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचे ओठ, गाल आणि त्यांचे डोळेही हलत आहेत, त्यांचा श्वास चालू असल्याप्रमाणे त्यांची छाती हलत आहे, त्यांचे हात आणि पाय यांची बोटेही हलत आहेत’, असे जाणवले. त्यांच्यातील चैतन्यामुळे असे जाणवत आहे, असे मी पहिल्यांदाच अनुभवले.’’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.(५.६.२०२४)


४.६.२०२४ या दिवशी संध्याकाळी ७.१५ वाजता सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांनी देहत्याग केला. ५.६.२०२४ या दिवशी सकाळी ८ वाजता, म्हणजे पू. मेनराय यांनी देहत्याग केल्यावर १३ घंट्यांनंतर प.पू. डॉक्टर पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्या मुलींना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. भगवंत कुमार मेनराय

१. सौ. मुक्ता कालरा (मोठी मुलगी), देहली

१ अ. पू. (कै.) पिताजींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ‘मी तुमची वाट पहात आहे; म्हणून तुम्ही आधी खोलीत या’, असे सांगणे : ‘प.पू. डॉक्टर पू. पिताजींचे  (माझ्या वडिलांचे) अंत्यदर्शन घ्यायला आले, तेव्हा आम्ही पू. पिताजींचे पार्थिव ठेवलेल्या खोलीच्या बाहेर उभे राहून प.पू. डॉक्टरांशी बोलत होतो. तेव्हा पू. पिताजी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्ही बाहेर उभे राहून का बोलत आहात ? मी तुमची वाट पहात आहे. प्रथम तुम्ही मला भेटा.’

१ आ. प.पू. डॉक्टर पू. पिताजींच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन गेल्यावर पू. पिताजी मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘आता मला काही नको. मी परमानंदात आहे.’

२. सुश्री (कु.) संगीता मेनराय (मधली मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सुश्री (कु.) संगीता मेनराय

२ अ. देहत्यागाच्या वेळी पू. पिताजींच्या देहातून चैतन्य, शक्ती आणि प्रकाश प्रक्षेपित होणे : ‘४.६.२०२४ या दिवशी संध्याकाळी ७.१५ वाजता पू. पिताजींनी देहत्याग केला. तेव्हा ते पुष्कळ आनंदी, समाधानी आणि शांत वाटत होते. ‘त्यांच्या देहातून पुष्कळ चैतन्य, शक्ती आणि प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

२ आ. पार्थिव चैतन्यदायी दिसणे : ५.६.२०२४ या दिवशी सकाळी ८ वाजता, म्हणजे पू. पिताजींनी देहत्याग केल्यानंतर सुमारे १३ घंट्यांनंतर मी त्यांचे पार्थिव पाहिले. तेव्हाही ‘ते ताजेतवाने आणि चैतन्यदायी वाटत होते. त्यांना बघून ‘ते शांत निद्रेत आहेत’, असे वाटत होते.

२ इ. पू. पिताजींच्या पार्थिवाचे दर्शन घ्यायला येणार्‍या साधकांना जाणवलेली सूत्रे

. पू. पिताजींच्या पार्थिवाचे दर्शन घ्यायला आलेल्या अनेक साधकांनी मला सांगितले, ‘‘उत्सव असल्यासारखेवातावरण आहे.’’

२. काही साधक मला म्हणाले, ‘‘पू. काकांकडे पुनःपुन्हा बघावेसे वाटते. ‘ते शांत झोपले आहेत’, असे वाटते.’’

३. सौ. ज्योती लिआओ (लहान मुलगी), सिडनी, ऑस्ट्रेलिया.

३ अ. ‘मृत्यूपूर्वीच्या कालावधीत पू. पिताजी लहान बाळासारखे झाले होते. 

३ आ. ‘अंत्यदर्शनाच्या वेळी मी त्यांना हार घालत होते, तेव्हा मी ईश्वरालाच हार घालत आहे’, असे मला वाटले.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक (५.६.२०२४))

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना सुश्री संगीता मेनराय यांना जाणवलेली सूत्रे

सौ. ज्योती लिआओ

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. पिताजींना भरभरून आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : ‘प.पू. डॉक्टर जेव्हा पू. पिताजींचे अंतिम दर्शन घेत होते, तेव्हा ‘पू. पिताजी प.पू. डॉक्टरांमध्ये पूर्णपणे विलीन होत आहेत. पू. पिताजींमधील चैतन्य सूक्ष्म स्तरावर अधिक कार्यरत होण्यासाठी प.पू. डॉक्टर पू. पिताजींना भरभरून आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवत होते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘पू. पिताजींविषयी  अभिमान वाटत आहे’, असे जाणवणे : पू. पिताजींनी गाठलेली अप्रतिम अवस्था पाहून परम पूज्यांना पू. पिताजींविषयी पुष्कळ कौतुक वाटत आहे. श्री गुरूंना आपल्या शिष्याविषयी ‘हा माझा शिष्य आहे’, असा अभिमान वाटला पाहिजे, तसा ‘प.पू. डॉक्टरांना पू. पिताजींविषयी अभिमान वाटत आहे’, असे मला जाणवले.

३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. पिताजी यांची प्रत्यक्ष भेट चालू आहे’, असे वाटणे : ‘प.पू. डॉक्टर पू. पिताजींच्या पार्थिवाचे दर्शन घेत असतांना ते पिताजींचे अंतिम दर्शन घेत नसून त्यांची आणि पू. पिताजी यांची भेट होत आहे. ते एकमेकांशी प्रत्यक्ष बोलत आहेत. तो एक आनंददायी क्षण आहे’, असे मला वाटत होते.

४. ‘पू. पिताजींचा पुढील प्रवास आनंददायी होत आहे’, असे जाणवणे : प.पू. डॉक्टर पू. पिताजींचे अंतिम दर्शन घेऊन गेल्यावर पू. पिताजींच्या पार्थिवातील चैतन्य वाढले असून ‘पू. पिताजींचा पुढील प्रवास पुष्कळ आनंददायी होत आहे. ते आनंदातून परमानंद स्थितीला गेले’, असे मला जाणवले.’

– सुश्री (कु.) संगीता मेनराय (पू. भगवंत कुमार मेनराय यांची द्वितीय कन्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०२४)


 सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती

 १. ‘पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना त्यांच्या चरणांतून पुष्कळ शक्ती प्रक्षेपित होत होती.

२. ‘पू. मेनरायकाकांचे शरीर मला सजीव वाटत होते. ‘ते आता उठून बोलतील’, असे मला वाटले.

३. पू. मेनरायकाकांच्या अंत्यविधीच्या वेळी सेवा करतांना माझा शरणागत भाव वाढला.

४. माझा नामजप चालू होऊन मनाला शांत वाटले.’

– कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक