कारागृहात राहून अमृतपाल जिंकला आहे खासदारकीची निवडणूक !
वॉशिंग्टन (अमेरिका) – पंजाबमधील अपक्ष खासदार आणि कारागृहात बंदीवान असलेला खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याची सुटका करण्यासाठी अमेरिकेत मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी अमेरिकेतील अधिवक्ता सरदार जसप्रीत सिंह यांनी पुढकार घेतला असून त्यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. या भेटीत अमृतपालच्या सुटकेसाठी अमेरिकेने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.
अधिवक्ता जसप्रीत सिंह पुढे म्हणाले, ‘‘अमेरिकेतील सर्व गुरुद्वारांचे प्रतिनिधी आणि अमेरिकेतील शीख समुदायाचे लोक यांनी अमृतपालच्या सुटकेचे सूत्र मला अमेरिका सरकारसमोर उपस्थित करण्यास सांगितले आहे. अमेरिकन सरकार या प्रकरणात निश्चितच हस्तक्षेप करील.’’ अधिवक्ता जसप्रीत सिंह यांनी याच सूत्रावर७ जून या दिवशी कोरी ब्रूकर यांची न्यू जर्सी येथे भेट घेतली होती.’’
संपादकीय भूमिकाअशा भारतविरोधी मोहिमांना अमेरिका विरोध करत नाही, उलट खतपाणी घालते, हे लक्षात घ्या ! |