Canada Target Killing : भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या

४ संशयितांना पोलिसांनी घेतले कह्यात !

युवराज गोयल

ओटावा (कॅनडा) – पंजाबमधील लुधियाना येथील भारतीय वंशाचा तरुण युवराज गोयल याची कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोयल वर्ष २०१९ मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडामध्ये आला होता आणि तो नुकताच कॅनडाचा कायमस्वरूपी रहिवासी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, युवराजचा कोणताही गुन्हेगारी इतिहास  नाही. त्याच्या हत्येमागचा हेतू तपासला जात आहे. पोलिसांनी ४ संशयितांना कह्यात घेतले आहे. मनवीर बसराम (वय २३ वर्षे), साहिब बसरा (वय २० वर्षे), आणि सरे येथील हरकिरत झुट्टी (वय २३ वर्षे) आणि ओंटारियो येथील केलॉन फ्रँकोइस (वय २० वर्षे) अशी संशयितांची नावे आहेत.