१. ‘स्वप्नांच्या माध्यमातून देव आपत्काळाची सिद्धता करून घेत आहे’, या विचाराने देवाविषयी कृतज्ञता वाटणे आणि देवाप्रतीचा भाव वाढणे
‘अनेक दिवसांपासून रात्री झोपेत मला आपत्काळाविषयी स्वप्ने पडतात. स्वप्नांमध्ये मला ‘कुठेतरी भूकंप झाला आहे किंवा महापूर आला आहे’, असे दिसायचे. त्यामुळे सकाळी उठल्यावर मला अस्वस्थ वाटत असे; पण काही दिवसांनी स्वप्ने पडत असूनही मला भीती आणि अस्वस्थ वाटणे बंद झाले. याउलट मला असे वाटू लागले की, देव झोपेतही माझ्याकडून आपत्काळाची सिद्धता करून घेत आहे. त्यामुळे मला देवाविषयी कृतज्ञता वाटू लागली आणि माझा देवाप्रतीचा भाव वाढू लागला. माझी ही भावस्थिती दिवसभर रहात असल्याने माझी सेवाही भावपूर्ण होऊ लागली.
२. एखादा नवीन प्रकल्प करायचा असल्यास प्रारंभी भीती वाटणे; पण आता ‘देवच माझ्याकडून सेवा करवून घेईल’, अशी मनाची स्थिती असल्याने देवाविषयी भाव वाटणे
मी संकेतस्थळासंबंधीच्या तांत्रिक (Technical) सेवा करतो. अनेक वर्षांपासून मी ही सेवा करत असूनही एखादा नवीन प्रकल्प करायचा असल्यास ‘मला ती सेवा जमेल का?’, असा विचार येऊन मला भीती वाटत असे; पण आता तशी भीती वाटत नाही. ‘देवच माझ्याकडून सेवा करवून घेईल आणि कधी काही जमले नाही, तरी त्यातूनही देव मला शिकवेल’, अशी मनाची स्थिती असते. त्यामुळे आता देवाविषयी भाव वाटतो.’
– श्री. रोहन मेहता, पाटणतळी, फोंडा, गोवा. (९.१०.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |