‘प.पू. डॉक्टर माझ्या आतच आहेत आणि तेच माझा आत्मा आहेत’, असा विचार आल्यावर भावजागृती होणे आणि आनंदातही वाढ होणे

सौ. छाया नाफडे

‘वर्ष २०२१ मध्ये प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या ‘सध्या रहात असलेल्या खोलीतील वस्तूंना स्पर्श केल्यावर काय जाणवते ?’, असा सूक्ष्मातील प्रयोग करून घेण्यात आला होता. त्या वेळी प.पू. डॉक्टर सेवेसाठी वापरत असलेल्या टेबलाला स्पर्श केल्यावर देवाने माझ्या मनात ‘देवाच्या या रूपाशी एकरूप व्हायचे आहे’, असा विचार घातला. बर्‍याच वेळा माझ्या मनात हा विचार यायचा; पण ‘ते साध्य कसे करायचे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. काही दिवसांपूर्वी मला प.पू. डॉक्टरांचे टेबलवर सेवा करणारे छायाचित्र मिळाले. तेव्हापासून माझी दिवसातून ५ – ६ वेळा प.पू. डॉक्टरांना ‘मला काहीच समजत नाही. तुमच्या या रूपाशी एकरूप कसे व्हायचे, ते मला शिकवा’, अशी प्रार्थना होते. त्यानंतर लिखाणाची भाषा पालटणे किंवा कठीण लिखाण असेल, तर ते सोपे करणे, हे मला काही अंशी जमू लागले. पूर्वी मला हे जमत नव्हते. ११.५.२०२४ या दिवशी सकाळी उठल्यावर ‘प.पू. डॉक्टर माझ्या आतच आहेत आणि तेच माझा आत्मा आहेत’, असा विचार आला. त्यानंतर त्या विचाराची आठवण झाली की, माझी भावजागृती होते आणि माझ्या आनंदातही वाढ झाली आहे.

‘हे भगवंता (प.पू. डॉक्टर), मी निर्बुद्ध आहे. मला काहीच येत नाही. जी थोडीफार सेवा मी करत आहे, ती आपलीच कृपा आहे. आता आपण माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी सेवा करून घ्या, हीच आर्त प्रार्थना !’

– सौ. छाया विवेक नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०२४)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.