मूळ शिवसेनेच्या एकूण १३ जागांपैकी ७ जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे !

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या मूळच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यावर लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत पूर्वीच्या शिवसेनेच्या १३ जागांपैकी ७ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्या असून उद्धव ठाकरे गटाने ६ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता कल्याण, मावळ, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले, ठाणे आणि उत्तर पूर्व मुंबई या जागा जिंकल्या आहेत.