Missing Indian student in california : भारतीय विद्यार्थिनी कॅलिफोर्निया विद्यापिठातून बेपत्ता !

फ्रेस्नो (कॅलिफोर्निया) – ‘कॅलिफोर्निया स्टेट विद्यापिठा’त शिकत असलेली नितीशा कंधुला ही २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी २८ मेपासून बेपत्ता झाली आहे. ती मूळची भारतातील भाग्यनगर येथील रहिवासी होती.

कॅलिफोर्नियाचे पोलीस अधिकारी जॉन गॉटिएरेज यांनी ‘एक्स’वर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून या मुलीला अखेरचे लॉस एंजल्समध्ये पाहिले गेल्याचे म्हटले आहे. नितीशा कंधुला हिच्याविषयी कुणालाही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याआधी भारतीय विद्यार्थी रूपेश चंद्र हा शिकागोतून बेपत्ता झाला होता. याआधी एप्रिलमध्ये घडलेल्या अन्य एका घटनेत पोलिसांना भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. मार्च महिन्यात ३४ वर्षीय शास्त्रीय नर्तिक अमरनाथ घोश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, तर फेब्रुवारी महिन्यात समीर कामत या २३ वर्षीय इंडो-अमेरिकन विद्यार्थ्याला ठार मारण्यात आले होते. या सगळ्या घटना ताज्या असतांनाच आता आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेत भारतीय असुरक्षित !