प्रवाशाने गुदद्वारात लपवले होते सोने !
मुंबई – मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने ९.७६ किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कह्यात घेतली आहेत. या सर्वांचे एकूण मूल्य ६.७५ कोटी रुपये आहे. ही सोन्याची तस्करी शॅम्पूची बाटली आणि रबराचे शीट यांच्यामधून करण्यात येत होती. संबंधित प्रवाशाने हे सोने गुदद्वारात लपवले होते. या प्रकरणी ४ प्रवाशांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकामुंबई विमानतळावर वारंवार होणार्या सोन्याच्या तस्करीवर पोलीस प्रशासन कधी नियंत्रण आणणार ? |