कापु (कर्नाटक) – पांगाळ मंडेडी येथील शरद शेट्टी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी योगीश आचार्य न्यायालयापुढे शरण आला आहे. ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी पांगाळ येथे शरद शेट्टी याची हत्या करण्यात आली होती. शेट्टी याची हत्या झाल्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत होते; मात्र पोलिसांना तो सापडत नव्हता. त्यानंतर २३ मे २०२४ या दिवशी आरोपी स्वतः न्यायालयापुढे उपस्थित झाला. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत पाठवले आहे.