छत्रपती संभाजीनगर येथे साहाय्यक अभियंता निलंबित !

छत्रपती संभाजीनगर – ‘इ.व्ही.एम्. स्ट्राँगरूमचे दायित्व सोपवण्यात आलेले महावितरणच्या एम्.आय.डी.सी. रेल्वेस्थानक शाखेचे साहाय्यक अभियंता दादासाहेब काळे यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी २९ मे या दिवशी निलंबित केले. मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडले नाही’, असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. दादासाहेब काळे रेल्वेस्थानक शाखेत ९ ऑगस्ट २०२१ पासून कार्यरत होते. एम्.आय.टी. येथे ठेवण्यात आलेल्या इ.व्ही.एम्. स्ट्राँगरूम परिसरातील वीज एक सेकंदही जाता कामा नये, याचे दायित्व त्यांच्यावर सोपवले होते.