ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना साधिकांना आलेल्या अनुभूती

१. कु. पूनम किंगर, मथुरा

अ. ‘ब्रह्मोत्सवात साधिका नृत्यसेवा सादर करत होत्या. तेव्हा एक क्षणभर माझ्या मनात विचार आले, ‘हा तर रासलीलेचा अत्युच्य भक्तीचा क्षण आहे. सर्व साधिका उच्च स्तरावरील भक्ती करत आहेत.’ मला वाटले, ‘एका क्षणासाठी त्या भक्तीचा लहानसा अंश मीही अनुभवत आहे.’

२. सौ. जयश्री गोडसे, रेवाडी, हरियाणा

अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच आमच्या घरात पुष्कळ सुगंध येत होता. ‘तो सुगंध घेत रहावा’, असे मला वाटत होते.

आ. गुरुदेवांना शरणागतभावात आणि नमस्काराच्या मुद्रेत पाहिल्यावर ‘आम्ही किती अल्प पडतो’, याची मला जाणीव झाली.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक