फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान दांपत्याचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

२० वर्षांपूर्वी झाले होते बलपूर्वक धर्मांतर !

शिवप्रसाद लोधी आणि कविता

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील फतेहपूर या गावात २० वर्षांपूर्वी  शिवप्रसाद लोधी आणि कविता या हिंदु दांपत्याला बलपूर्वक इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले होते. आता या दांपत्याने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. गावचे प्रमुख महंमद अमील शेख याने सरकारी कागदपत्रे देण्याच्या बदल्यात या दांपत्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला होता.

१. हे हिंदु दांपत्य वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहे; मात्र रोजगाराच्या शोधात ते फतेहपूर या गावात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. अशा परिस्थितीत त्यांच्या असहायतेचा अपलाभ उठवत गावातील मुसलमान प्रमुखाने त्यांना इस्लाममध्ये धर्मांतर करण्यास भाग पाडले .

२. शिवप्रसाद याचे नाव पालटून अब्दुल्ला, तर कविताचे नाव फातिमा ठेवण्यात आले. त्यांना बनावट ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्रात त्यांच्या आई-वडिलांची नावेही बनावट होती. गावात त्यांची फसवणूक करून त्यांना लुटण्यात आले. तसेच त्यांच्यावर  इस्लामनुसार कृती करण्यास दबाव टाकण्यात आला.

३. वर्ष २०२३ मध्ये शिवप्रसाद याने ‘रामबल’ नावाच्या हिंदु संघटनेशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी संस्थेला माहिती दिली. त्यानंतर संस्थेने क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांना कळवले आणि शिव-कविता यांच्या हिंदु धर्मात पुनर्प्रवेशाची व्यवस्था केली.