कोसीकला (उत्तरप्रदेश) येथील मुसलमान दुकानदाराने पिशव्यांवर ‘पंजाबी मार्केट’ऐवजी ‘इस्लामिक मार्केट’ छापले !

  • व्यापार्‍यांच्या तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्ष

  • सामाजिक माध्यमांतून विरोध झाल्यावर पोलिसांनी केली कारवाई !

कोसीकलां (उत्तरप्रदेश) – येथील पंजाबी मार्केटमधील वाहिद कुरेशी नावाच्या  दुकानदाराने प्लॉस्टिक पिशवीवर ‘पंजाबी मार्केट’ऐवजी ‘इस्लामिक मार्केट’ असे छापले. त्यामुळे येथील संतप्त व्यापार्‍यांनी पोलिसांना कळवले; मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून पिशव्यांचा विरोध केल्यानंतर पोलिसांवर दबाव निर्माण झाला आणि त्यांनी वाहिद कुरेशी याला अटक केली. शांतता भंग केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तसेच नगर परिषदेच्या महसूल विभागाने दुकानावर धाड टाकून २५ किलो पिशव्या जप्त केल्या.

नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी निहाल सिंग म्हणाले की, कोणत्याही रस्त्याचे, परिसराचे किंवा बाजाराचे नाव पालटण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. वाहिद कुरेशी याच्या या कृत्याने वातावरण चिघळले होते. दुकानदाराला नोटीस बजावण्यात आली असून ३ दिवसांत उत्तर मागवण्यात आले आहे. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना मुसलमान व्यापारी अशा प्रकारचे धाडस करतो यातून त्यांना कशाही भीती नाही, हे स्पष्ट होते. अशा मानसिकतेचे धर्मांध देशालाच इस्लामी राष्ट्र करण्यासाठी टपलेले आहेत, हे लक्षात घ्या !
  • व्यापार्‍यांच्या तक्रारीनंतर कारवाई न करणार्‍या पोलिसांवर योगी आदित्यनाथ सरकारने कारवाई केली पाहिजे !