वर्ष २०२४ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्याविषयी महर्षींनी सांगितलेली सूत्रे !

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

‘या वर्षी गुरुदेवांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र २७.५.२०२४ या दिवशी सकाळी १०.१४ वाजता आरंभ होत आहे, तसेच गुरुदेवांची वैशाख कृष्ण सप्तमी ही जन्मतिथी ३०.५.२०२४ या दिवशी पूर्ण होते. यासाठीच या वर्षी गुरुदेवांचा जन्मोत्सव २७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत साजरा करावा. २७.५.२०२४ या दिवशी साधकांनी आपापल्या घरी वैयक्तिकरित्या गुरुदेवांची मानसपूजा करून त्यांचा जन्मोत्सव साजरा करावा. गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत २८ ते ३०.५.२०२४ या ३ दिवसांच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवचंडी याग करावा.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, २९.४.२०२४)

(विशेष सूचना : वर्ष २०१५ पासून महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सर्व जण गुरुदेवांचा जन्मोत्सव साजरा करत आलो आहोत. या वर्षी आपण दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘जन्मोत्सव विशेषांक’ आज २६.५.२०२४ या दिवशी प्रसिद्ध करत आहोत.)