Arrests For Rave Party : मध्यप्रदेशात रेव्ह पार्टी करणार्‍या ११ तरुणींसह ४५ जणांना अटक !

भोपाळ – महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशमधील एका ठिकाणी रेव्ह पार्टी करणार्‍या ११ तरुणी आणि ३४ पुरुष यांना पोलिसांनी अटक केली. हे सर्व जण मध्यप्रदेशमधील एका रिसॉर्टमधील ‘वॉटर पार्क’मध्ये अश्‍लील गाण्यांवर नृत्य करत होते. अटक करण्यात आलेल्या महिला नागपूर येथील आहेत. पोलिसांनी धाड घातल्यावर अटक केलेले सर्व जण नशेच्या धुंदीत होते. पोलीस या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत.

या रिसॉर्टचा मालक अमरावती जिल्ह्यातील वरूड या गावाचा आहे. तिथे ग्राहकांसाठी अनेक छोटे फार्म हाऊस बांधण्यात आले असून ते भाडेतत्त्वावर दिले जातात. पुणे येथील पोर्शे कारच्या धडकेने झालेल्या भीषण अपघाताच्या प्रकरणी पबच्या विकृतीवर  मोठ्या प्रमाणात टीका होत असतांनाच रेव्ह पार्टीची ही घटनाही उघडकीस आली आहे.

संपादकीय भूमिका

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करून स्वतःचा आत्मघात करून घेणारी हल्लीची तरुण पिढी !