श्रीलंकेचे नागरिक असल्याची माहिती !
कर्णावती (गुजरात) – २ दिवसांपूर्वी येथील विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांनी भारतात आक्रमणाचा कट रचल्याची स्वीकृती दिली आहे. ते श्रीलंकेचे नागरिक असल्याची माहिती समोर आली असून ते पाकिस्तानी हस्तकाच्या (‘हँडलर’च्या) संपर्कात होते, अशी माहितीही त्यांनी दिली. कर्णावती शहरात त्यांच्यासाठी शस्त्रे ठेवण्यात आली होती. ती घेतल्यानंतर त्यांना कुठे आणि कधी आक्रमण करायचे ?, हे सांगण्यात येणार होते. चौघांच्या भ्रमणभाषमध्ये सापडलेल्या ‘भौगोलिक निर्देशांकां’च्या आधारे शहरातील एका ठिकाणाहून ३ पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गुजरातचे पोलीस महासंचालक विकास सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार महंमद नुसरत, महंमद नुफ्रान, महंमद फारिस आणि महंमद रझदीन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत. हे चौघे चेन्नईहून कर्णावतीला विमानाने आले होते. या चौघांच्या अटकेच्या दुसर्या दिवशी, म्हणजे २१ मेला ‘आय.पी.एल्.’ स्पर्धेसाठी कर्णावतीतील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर क्रिकेटचा सामना झाला, तसेच २२ मे या दिवशीही येथे सामना झाला. त्या दृष्टीकोनातून ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
संपादकीय भूमिकायावरून जिहादी आतंकवादी देशाच्या आणि हिंदूंच्या मूळावर उठले आहेत, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सरकारने अशा आतंकवाद्यांसह त्यांना साहाय्य करणार्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजेत ! |