अमेरिकेने त्यांच्याच सरकारचा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल फेटाळला

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा करण्यात आला होता दावा !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचा ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल’ फेटाळला आहे. या अहवालामध्ये ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत’, असे म्हटले होते. भारताने या अहवालावर टीका केली होती.

‘UNCIRF चा मूळ अहवाल’

‘न्यूयॉर्क टाइम्स’चे भारतविरोधी वृत्तही अमेरिकेने फेटाळले !

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात १९ मे या दिवशी एक अहवाला प्रसिद्ध करण्यात आला होता. या म्हटले होते, ‘भारतात रहाणार्‍या मुसलमान कुटुंबांना बाजूला केले गेले आहे. तिथे त्यांची ओळख पडताळून पाहिली जात आहे.’ यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, आम्ही हे वृत्त पूर्णपणे फेटाळतो. जगभरातील धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी अमेरिका सदैव तत्पर आहे. यासाठी आम्हाला भारतासह इतर अनेक देशांचा पाठिंबा मिळाला आहे.

भारतद्वेषी अमेरिकी प्रसारमाध्यमे !

सीबीएसने पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचाराचे वर्णन मुस्लिमविरोधी असे केले आहे.
सीएनबीसीने या निवडणुकीला लोकशाहीसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन न्यूज चॅनल फॉक्सने 20 मे रोजी लिहिले होते – अयोध्येत मुस्लिमांना सतत धमकावले जात आहे.

भारतात लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून अमेरिकेतील प्रसारमाध्यमांकडून भारतविरोधी वृत्ते प्रसारित केली जात आहेत. त्याच वेळी अमेरिकी सरकारकडूनही भारताविरोधात विधान करण्यात आले होते. ‘भारतातील धर्मनिरपेक्ष रचनेला धोका आहे. पंतप्रधान मोदी तिसर्‍यांदा सत्तेत आल्यास देशात मुसलमानांविरुद्ध हिंसाचार वाढेल, तसेच भारत सरकार मुसलमानांना दूर करेल’, अशा प्रकारची वृत्ते प्रसारित केली जात आहेत.

दुसरीकडे १७ मे या दिवशी अमेरिकी सरकारने म्हटले होते की, भारतातील निवडणुकीवर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतापेक्षा जगात कुठेही ज्वलंत लोकशाही नाही. मत देण्याची आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची भारतियांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.