पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – काश्मीरमधील पुलवामा येथे वर्ष २०१९ मध्ये झालेल्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानकडून होणार्या आयातीवर २०० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. तसेच पाकसमवेतची काश्मीर बस सेवा आणि व्यापार बंद केला. तेव्हापासून भारतासमवेतचा व्यापार बंद आहे, अशी माहिती पाकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री असलेले इशाक डार यांनी पाकच्या संसदेत दिली.
डार पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार शर्मिला फारूकी यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. या प्रश्नात फारूकी यांनी भारतासमवेतच्या संबंधांमध्ये पाकिस्तानला भेडसावणार्या व्यापारी आव्हानांची माहिती मागितली होती.