मुंबई – घाटकोपरमध्ये ज्या पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून अपघात झाला, तो संपूर्ण पंपच अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. घाटकोपरच्या रेल्वे पोलीस वसाहतीच्या भूखंडावरील पेट्रोल पंप अनधिकृत असून ही जागा शासन निर्णयानुसार शैक्षणिक अथवा प्रशासकीय इमारतीसाठी असायला हवी. पेट्रोल पंपासाठी लागणारे अंतिम ना हरकत प्रमाणपत्रही उपलब्ध नाही. हा भूखंड गृहखात्याचा असून महसूल विभागाची अनुमती न घेता वाणिज्य कामासाठी वापरला जात होता.
१. पोलीस गृहनिर्माण महामंडळाने वेळोवेळी पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत पेट्रोल पंप बांधकामावर हरकत घेतली होती. हे बांधकाम थांबवण्यासाठी पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृहविभागाला पत्रव्यवहार करून अनुमतीही नाकारली होती.
२. खरेतर या भूखंडावर पोलीस निवासस्थाने बांधण्याची नितांत आवश्यकता असून अवतीभवती पोलीस वसाहतीत कुटुंब रहात असल्याने पेट्रोल पंपासाठी मागण्यात आलेली ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्रदान करणे शक्य नसल्याचा अभिप्राय मंडळाने दिला होता. तरीही पेट्रोल पंपाचे काम चालू करण्यात आले.
३. महामंडळाने हरकत घेऊनही तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन पोलीस महासंचालकांनी पेट्रोल पंपाला अनुमती दिली.
संपादकीय भूमिका :होर्डिंग पडल्यानंतर अशा घटना उघड होणे दुर्दैवी ! |