Ajith Hanumakkanavar : ‘सुवर्ण वाहिनी’चे संपादक अजित हनुमक्कनवर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

भारतातील मुसलमानांना पाकिस्तानी राष्ट्रध्वजासह दाखवल्यावरून मुसलमानाची तक्रार !

‘सुवर्ण वाहिनी’चे संपादक अजित हनुमक्कनवर

बेंगळुरू – ‘सुवर्ण वाहिनी’चे संपादक अजित हनुमक्कनवर यांच्यावर त्यांनी एका कार्यक्रमातून भारतातील मुसलमानांचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तन्वीर अहमद नावाच्या मुसलमानाने त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

९ मेच्या रात्री साडेआठ वाजता हनुमक्कनवर हे कार्यक्रमाचे निवेदन करत होते. या वेळी पडद्यावर हिंदूंची लोकसंख्या अल्प होत असल्याचे आणि मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लिहिण्यात आले होते. भारताचा राष्ट्रध्वज लावून हिंदूंच्या जनसंख्येत ७.८२ टक्के घट आणि पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लावून मुसलमानांच्या जनसंख्येत ४३.१५ टक्के वाढ, असे कार्यक्रमात दाखवण्यात आले. यातून भारतीय मुसलमानांना पाकिस्तान येथील संबोधून अवमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हनुमक्कनवर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे