PM Modi Nomination : पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून भरला उमेदवारी अर्ज !

पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरताना

वाराणसी (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ मे या दिवशी वाराणसीतून लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. पंतप्रधान मोदी तिसर्‍यांदा येथून निवडणूक लढवत आहेत.

अर्ज भरतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदी उपस्थित होते.