Delhi Hospital Bomb Threat : देहलीतील अनेक रुग्णालयांना बाँबने उडवून देण्याची धमकी

नवी देहली – काही दिवसांपूर्वी देहलीतील १०० हून अधिक शाळांना, तसेच काही विमानतळांना बाँबने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती; मात्र ती अफवा असल्याचे उघड झाले होते. आता १४ मे या दिवशी देहलीतील अनेक रुग्णालयांच्या बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली. यात दीपचंद बंधू, दादा देव, हेडगेवार आणि जीटीबी रुग्णालयांचा समावेश आहे. पोलिसांनी रुग्णालयांची तपासणी केल्यावर काहीच सापडले नाही.

१४ मे या दिवशी उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ४ शाळांना बाँबने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सर्व शाळांची पोलिसांनी तपासणी केल्यावर काहीच सापडले नव्हते. याच दिवशी राजस्थानची राजधानी जयपूर येथील ५६ शाळांनाही अशाच प्रकारची धमकी मिळाली होती.

संपादकीय भूमिका

गेल्या काही दिवसांत देशात शाळा, रुग्णालये, विमानतळे यांना बाँबने उडवून देण्याची खोट्या धमक्या देण्यात येऊन पोलिसांवर ताण निर्माण करण्याचाच प्रयत्न केला जात आहे. यामागील लोकांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे !