पू. गुरुनाथ दाभोलकर यांचे अनमोल विचारधन !
‘आपल्या एखाद्या कृतीचे कौतुक झाल्यास आपण त्याचे श्रेय गुरुमाऊलींना देऊन कृतज्ञता व्यक्त करतो. मला साधकांना सांगावेसे वाटते, ‘कृतज्ञता’ या शब्दाची व्याप्ती आपण लक्षात घेतो का ? ‘स्वामी तिन्ही जगाचा गुरुमाऊली विना भिकारी.., त्रैलोक्याचा नाथ माझा पंढरीनाथ..’ असे म्हटले जाते. आपली गुरुमाऊलीही तिन्ही जगाची माऊली आहे. आपली गुरुमाऊली त्रिलोकीचा नाथ आहे. आपण त्यांच्या प्रती व्यक्त करत असलेली ‘कृतज्ञता’ अफाट वाळवंटातील एक वाळूच्या कणासारखी अथवा अथांग महासागरातील एका थेंबासारखी आहे. प्रीतीचा महासागर असलेल्या आपल्या गुरुमाऊलीची कृपा अनमोल आहे ! साधकांनो, आपण गुरुमाऊलीप्रती सदैव शरणागत राहून कृतज्ञ राहूया !’ – (पू.) गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.