असुरक्षित नाशिक !
नाशिक – ८ मेच्या मध्यरात्री देवळाली गावच्या रोकडोबावाडी परिसरात अरमान शेख या १८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे देवळाली गावासह आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २ व्यक्तींनी दुचाकीवर येत कोयता आणि धारदार शस्त्र यांनी अरमानवर आक्रमण केले. बिटको रुग्णालयात उपचारदारम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्याला उपचारार्थ दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असतांना हाताला रक्त लागले, असे दाखवणारेही काही जण होते, त्यामुळे पोलिसांनी कसून अन्वेषण करावे, असे स्थानिकांनी सांगितले.